रेमण्ड शोरूमच्या नुतनीकृत दालनाच्या शुभारंभ

0
14

नगर – सर्वात वेगाने वाढणारा फॅशन फॅब्रिक ब्रँड असलेल्या अहमदनगर येथील रेमण्ड शोरूमच्या अद्ययावत व प्रशस्त अशा नुतनीकृत दालनाच्या शुभारंभ प्रसंगी आ.संग्राम जगताप यांनी सदीच्छा भेट दिली. या प्रसंगी रेमण्ड शोरूमचे संचालक रूबेन डिसोझा व निहार भरणे यांनी स्वागत केले. रेमण्डच्या या नुतनीकृत प्रशस्त दालनात खरेदीचा आनंददायी अनुभव आता ग्राहकांना घेता येईल. वैविद्यपुर्ण बॅ्रंड असलेल्या रेमण्ड शोरूममध्ये सुटींग, शर्टींग, रेडिमेडस्, सूट, ट्राऊझर्स, जीन्स, टी शर्टस्च्या उत्कृष्ठ कपड्यांची मालिका ग्राहकांना पहायला मिळेल. तसेच परफेट टेलरींगची सुविधा देखील उपलब्ध असून विवाह खरेदीसाठी खास व्यवस्था शोरूममध्ये उपलब्ध आहे अशी माहीती संचालक रूबेन डिसोझा यांनी दिली.