महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा; ऐन उन्ळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती

0
32

पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करणार : भगवान फुलसौंदर

नगर – गेल्या एक महिन्यांपासून ऐन उन्ळ्यात नागरिकांच्या नळाला पाणी येत नसून, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन निवडणुकीत लोकशाहीचा उत्सव, सणासुदीचे दिवस, लग्न सराई, उष्णाता यामुळे या दिवसात पाण्याची गरज जास्त असते. त्यातच मनपाने पाणी कपात केली आहे. नागरिक खाजगी टँकरद्वारे पाण्याची गरज भागवत आहेत, तेही नियमित मिळत नाहीत. परिसरातील सर्व नागरिक हे नियमित कर भरणारे आहेत.

पाणी वितरण व्यवस्था सुरळीत न झाल्यास नागरिकांसमवेत जन आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. प्रभाग १४ मधील बुरुडगांव रोड, नक्षत्र लॉन, विनायकनगर, फुलसौंदर मळा, समता कॉलनी, आंचल विहार, वसंत विहार, अहिंसानगर, एकाडे मळा येथे अनियमित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी दिला आहे.