नगर – नगर कॉलेज जवळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कार्यालयासमोर हाजी हसन शहा कादरी कब्रस्तानच्या गेट समोर ड्रेनेज चेंबर पूर्णपणे भरल्याने त्यामधून घाण पाणी गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर वाहत होते. याबाबत माजी नगरसेवक अविनाश घुले यांना याबाबत कळाल्यानंतर त्यांनी स्वत: त्या ठिकाणी जात तातडीने मनपाचे स्वच्छता निरीक्षक यांना संबंधित ठिकाणी बोलावून परिस्थितीची माहिती देत तुंबलेले ड्रेनेज तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सफाई कामगारांनी उपाययोजना राबवून ड्रेनेज लाईन साफ करुन दुरुस्ती केल्याने रस्त्यावर येणारे घाण पाणी थांबले. नगरसेवक अविनाश घुले यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल परिसरातील नागरिकांनी यांचे आभार मानले.
नगरसेवक अविनाश घुले यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांनी मानले आभार
एसबीआय, जिल्हाधिकारी कार्यालय, हातमपुरा आदि भागातून ही ड्रेनेज लाईन येत असल्याने तसेच दोन दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या पाण्याबरोबरच या ड्रेनेज लाईनमध्ये कचरा, घाण अडकली होती. त्यामुळे विद्युत महामंडळासमोरच चेंबर तुंबल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच या भागात असलेल्या कब्रस्तान असल्याने नेहमीच या ठिकाणी वर्दळ असते. त्यामुळे त्यांनाही रस्त्यावरुन वाहणार्या घाण पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत. याबाबत मनपात तक्रार देखील केली, परंतु योग्य दखल घेण्यात आली नाही. तेव्हा अविनाश घुले यांना याबाबत कळविल्यानंतर त्यांनी तातडीने मनपा यंत्रणा कामाला लावत स्वत: उभे राहून हे काम पुर्णत्वास नेले. यावेळी आरोग्यविभागाचे राजेश तावरे, बोरगे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.