केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत ८०९ रँक मिळवत नगरच्या सिद्धार्थ तागड याचे यश

0
9

नगर – केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाच्या २०२३ परिक्षेचा निकाल १६ एप्रिल रोजी जाहीर झाला. अहमदनगर जिल्ह्यातील सिध्दार्थ लक्ष्मण तागड याने देशपातळीवरील परीक्षेत (णझडउ) ८०९ रँक मिळवून दुसर्‍या प्रयत्नात बाजी मारली. सिध्दार्थ याने बी.टेक (मॅकेनिकल) इंजिनिअरींग पदवी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (उजएझ), पुणे येथून २०२१ साली प्राप्त केल्यानंतर नागरी केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. २०२२ साली घेण्यात आलेलया परीक्षेत त्याने मुलाखती पर्यंत मजल मारली (प्रथम प्रयत्न). २०२३ साली घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने ८०९ रँक प्राप्त करण्यात यश मिळविले. सिध्दार्थ तागड याचे १० वी पर्यंतचे शिक्षण श्री समर्थ विद्या मंदीर प्रशाला, सावेडी येथे झाले असून, इ. १० वी मध्ये त्याला ९७.६०% गुण आहेत.

इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण रेसिडेन्शिअल ज्युनियर कॉलेज, अहमदनगर येथे झाले. इ. १२ वी परिक्षेत सिध्दार्थला ९०.७७% गुण मिळालेले आहेत. २०१७ साली घेण्यात आलेलया सीईटी परीक्षेला त्याला १७३/२०० मार्क आहेत. सिध्दार्थचे वडील डॉ. लक्ष्मण निवृत्ती तागड राहुरी कृषि विद्यापीठातील गवत संशोधन योजनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सिध्दार्थची आई सौ. जयश्री लक्ष्मण तागड उच्चशिक्षीत असून, कुटुंब व्यवस्थित सांभाळते. सिध्दार्थच्या यशात आईचा सिंहाचा वाटा आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.