ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0
18

मनपा अतिरिक्त आयुतांना निवेदन

नगर – कोठी परिसर मार्केट यार्ड रोड येथील बंद अवस्थेत असलेल्या हॅन्ड पंपची दुरुस्ती करून देण्यात यावी व अहमदनगर कॉलेज येथील विद्युत महावितरण कार्यालय शेजारी असलेल्या हाजी हसन शहा कादरी कब्रस्तान येथे अनेक भाविक दर्शनासाठी येजा करत असून या ठिकाणी उघडे ड्रेनेज चेंबरवर मोठे स्लॅब टाकण्यात यावे. कोठी चौक ते साळवे घर व लोंढे घरासमोरील सतत ड्रेनेजचे घाण पाणी ओव्हर फ्लो होत असून संपूर्ण घाण पाणी रस्त्यावर येत असून त्या ड्रेनेजची स्वच्छता करण्यात यावी. चेंबर ब्लॉक काढून देण्यात यावे आणि उघड्या ड्रेनेज चेंबरवर झाकण टाकण्यात यावे. परिसर स्वच्छ करण्याच्या मागणीसाठी मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना स्वप्निल शिंदे, आकाश कोरे, विशाल झेंडे, बॉबी गायकवाड, अनिकेत पारधे, वैभव पारधे, अब्रार शेख, विजय झेंडे, सोनू आंग्रे, अफान शेख आदींनी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, परिसरात ड्रेनेजच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, येथे राहणार्‍या लोकांना व जाण्या येणार्‍या लोकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीमुळे त्रास होतो. त्यामुळे या परिसरातील नागरिक आजारी पडण्याची शयता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे तेथे रस्त्यावर उघडे ड्रेनेज आहे, सदरील ड्रेनेजवर चेंबर झाकण नसल्याने कोणतीही दुर्घटना घडू शकते त्यामुळे तेथे झाकण टाकण्यात यावे, या परिसरात लक्ष देऊन या परिसरातील नमूद सर्व बाबींची शहानिशा करून पाहणी करून लवकरात लवकर औषध फवारणी करण्यात यावी, ड्रेनेजचे सुद्धा त्वरित काम करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.