गांधीनगर बोल्हेगाव व गणेश चौक हा मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल : मनोज पारखे

0
11

कामाची मनपाने केली पाहणी

नगर – जिल्हा नियोजन समिती व अहमदनगर महानगरपालिका यांच्या वतीने बोल्हेगाव गांधीनगर व गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याचे काम हे नगर शहरात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येत आहे त्यामुळे हा रस्ता जर कोणी खोदला नाही तर अनेक वर्ष टिकेल व डांबरीकरणाचे रस्ते देखील दर्जेदार होत असून त्यावर पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी देखील घेतली जाईल, नियोजनबद्ध रस्त्याची कामे सुरू असून जमिनीअंतर्गतील कामे आधी मार्गी लावली जात असून त्यानंतरच रस्त्याची कामे हाती घेतली जात आहे. गांधीनगर बोल्हेगाव व गणेश चौक हा डांबरीकरणाचा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल अशी माहिती मनपाचे शहर अभियंता मनोज पारखे यांनी दिली. अहमदनगर जिल्हा नियोजन समिती व अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने बोल्हेगाव गांधीनगर व गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत सुरू असलेल्या कामाची पाहणी मनोज पारखे यांनी केली.

यावेळी इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, इंजि. आदित्य बल्लाळ, बापू साठे आदी उपस्थित होते अभियंता मनोज पारखे यांनी रस्ता डांबरीकरणा संबंधात माहिती देताना सांगितले की, आचारसंहिता आधी कार्यारंभआदेश होऊन रस्त्याचे काम चालू करून ३१ एप्रिल पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, सदर रस्ता आधुनिक पद्धतीचा असून काम जलद गतीने होण्यास देखील मदत होते, त्यामुळे दोन्ही रस्ते अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून व आयूक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चौक ते आरडे दुकान व गांधीनगर रस्ता दोन रस्ते प्रस्तावित केलेले आहे, मंजूर प्रशासकीय मान्यतेनुसार काम प्रगतीत असून या रस्त्याच्या कामामध्ये सॉईल स्टॅबिलायझेशन या नवीन प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये रस्त्याची खोदाई करून रस्त्याखालचा थर नेहमीप्रमाणे करणे हा नियमित भाग आहे.

जीएसबी प्रकारातील थर टाकून त्यावरती सिमेंटचे सुमारे ४० एमएम थर सिमेंट स्प्रेडर या मशीनद्वारे टाकून व झायडेस केमिकल हे पर युबिक मीटरला साडे सातशे एम एल याप्रमाणे सॉईल स्टॅबिलेशन या मशीनद्वारे सुमारे साडेतीनशे एम एम जाडीचा थर अँकर प्रकारातून नांगरून मशागत केल्यासारख तो सर्व खडी मुरूम व केमिकलचा थर एकत्र करून पुनश्च पसरवला जातो. त्यावरती पॅड फूट रोलर प्रकारातील रोलर त्या थरावरती दबाइ केली जाते तदनंतर सदर थराचे प्रोफाइल करेशन करिता ग्रेडर मशीन द्वारे हावरी करून त्यावरती सॅाईल कॉम्पॅटर प्रकारातील कॉम्पॅटरने दबाई केली जाते. त्यावरती उर्वरित सर्व थर म्हणजे डांबरीकरणातील केले जातात या प्रकारातील रस्ता जर इतर कारणांनी खेादला नाही बर्‍याच कालावधी करिता काही होणार नाही. सदर रस्त्याचे बाजुने भविष्यात गटर करण्याचे नियोजित आहे हे काम महाडा तालुयातील टेंभुर्णी येथील देशमुख अँड कंपनीच्या ठेकेदारामार्फत करण्यात येत असून रोड क्रॉसिंग साठी नागरिकांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले.