0
32

नगर – जिल्हयात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत झालेली पर्जन्यमानातील तूट तसेच उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, चाराटंचाई तसेच दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, अहदमनगर येथे टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला असून, कक्षाचा दूरध्वनी क्र.१०७७ (टोल फ्री) व ०२४१- २३२३८४४ असा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली आहे.