नगर – शहराचे माजी महापौर व शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये कोरोना काळात ज्या मुलांचे पालक दगावले आहेत अशा १० वी १२ वीत जाणार्या १० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व अभिषेक कळमकर यांच्या श्रीयोग प्रतिष्ठान ने स्वीकारलेलं व एकूण रु ५०,००० रु देण्यात आले आहे. या दहा विद्यार्थ्यांनी आपल्या आईसह या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याला पाच हजार रुपयांचा चेक दिला दिला गेला त्यासाठी जगदंब फाउंडेशन व साऊ एकल महिला पुनर्वसन समितीने नावे सुचवले होते. या वाढदिवसाच शुभेच्छा देण्यासाठी राणीताई लंके, दादाभाऊ कळमकर, विक्रम राठोड, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक दत्ता जाधव, ओंकार सातपुते, नलिनी गायकवाड, अशोक कुटे, भीमराज कराळे, निलेश मालपाणी, श्री. भांबरकर, रेणुका वराडे, प्रकाश पोटे, अशोक बाबर, अशोक भोसले, नामदेव पवार आदी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी त्यांना शुभेछया दिल्या व सत्कार केला.