उसने दिलेले पैसे परत मागितल्याने लोखंडी रॉडने मारहाण; तिघाजणांवर गुन्हा दाखल

0
39

नगर – उसने दिलेले पैसे परत मागितल्याने तिघांनी एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आगरकर मळ्यात घडली आहे. या प्रकरणी तिघाजणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य संजय शिदोरे (वय ३२, रा. जिल्हा परिषद कॉलनी, आगरकर मळा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिदोरे यांनी आरोपी हितेश अजय बोरा यांना पैसे दिलेले होते. ते त्यांनी परत मागितले असता १० एप्रिल रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हितेश बोरा व त्याच्या सोबत असलेल्या २ अनोळखी इसमांनी शिदोरे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी रॉडने मारहाण करत जबर जखमी केले. या मारहाणीत जखमी झालेल्या शिदोरे यांनी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रविवारी (दि.१४) पहाटे कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून हितेश बोरा व २ अनोळखी इसमाविरोधात भा.दं.वि.कलम २२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.