महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी तन मन धनाने काम करावे

0
88

अहिल्यानगर दक्षिण जिल्हा व शहर जिल्हा पदाधिकारी प्रबंधन व कोअर कमिटीच्या बैठकीत आवाहन

नगर – महायुतीचे उमेदवार डॉटर सुजय विखे पाटील यांना विक्रमी मताधियाने निवडून आणण्यासाठी ही बैठक असून, यामध्ये सुपर वॉरियर्स भाजपा मोर्चा आघाडीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी काम करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नमस्कार पत्र, मोदी परिवार स्टिकर्स या माध्यमातून तसेच समाज घटकांशी पदाधिकारी संवाद साधणार आहेत. ५१ टक्के बुथवरची लढाई जिंकण्याची जबाबदारी दिली आहे. प्रत्येक घराघरात संपर्क साधला जाणार आहे. प्रत्येक जण रोज किमान आठ तास पक्ष व देशासाठी वेळ देणार आहे. मोदींना तिसर्‍यांदा विश्वनेता तसेच भारताला विश्व गुरु होण्याकरिता प्रत्येक जण तन-मन-धनाने यात सहभागी होणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले. अहिल्यानगर दक्षिण जिल्हा व शहर जिल्हा पदाधिकारी प्रबंधन व कोअर कमिटीची कोहिनूर मंगल कार्यालयात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचार नियोजनाच्या बैठकीत भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रा. भानुदास बेरड, प्रशांत मुथा, नितीन शेलार, सदाशिव देवगावकर, सुनील रामदासी, महेंद्र गंधे, प्रिया जानवे, सचिन पारखी, प्रशांत मुथ्था, महेश नामदे उपस्थित होते. यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष, महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी, आघाडी प्रमुख, सुपर वॉरीयर आदी उपस्थित होत