नगर जिल्ह्यातील गोशाळेच्या मागे उभा राहणार, गोरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करणार : राजूभाई शहा

0
29

नगर – वर्धमान संस्कारधाम संस्था (मुंबई) तर्फे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश येथील गोशाळेसाठी चारा निवारा देण्याचे काम करतो. दुष्काळ परिस्थितीत नगर जिल्ह्यातील गोशाळेच्या मागे उभा राहणार असून गोरक्षकांना गोरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन वर्धमान संस्कार धामचे राजूभाई शहा यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गोरक्षकांचे गौसेवेचे कार्य अविरतपणे करीत आहेत. गौसेवा हे इश्वरीय कार्य आहे. गौमातेला कसायांच्या तावडीतून सोडवावे हे गोरक्षकांचे कर्तव्य आहे. त्याच बरोबर गोरक्षण कसे करावे. याविषयी मार्गदर्शन आखिल भारतीय कृषी गौसेवा महासंघाचे मिलिंद एकबोटे यांनी केले. महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीचे उपसमिती अध्यक्ष अ‍ॅड. अशोक जैन यांनी गोरक्षण करण्यासाठी लागणारे व सर्व प्रकारची कायदेशीर मदत २४ तास देण्याचे आश्वासन दिले. आणि गोरक्षक आणि गोसंवर्धन बाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मनोगत व्यक्त केले. कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. किशोर जैन यानी गोरक्षणाचा कायद्याचा चौकटीत राहून गोरक्षण कसे करावे. या विषयक माहिती गोरक्षकांना दिली.

गोशाळा आणि गोरक्षण काळाची गरज असल्याचं मत भाजपाचे वसंत लोढा यांनी व्यक्त केले. या मेळाव्या प्रसंगी हभप रवींद्रनाथ महाराज सुद्रिक, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे, जीवदया गोशाळेचे राजूभाई दोशी, मयूर राजपुरोहित, सतीश नाना मोरे, सौ. मनीषा काळे, निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास जाधव, खजिनदार गजेंद्र सोनवणे, विश्वास बेरड, बजरंगदलाचे विशाल काटे, सनी थोरात, अमोल हुंबे पाटील, विशाल काटे, मिलिंद राऊत, सरपच संजय गेरंगे, श्रीकांत साठे, अवीनाश सरोदे, दिनेश हिरगुडे, मनोज फुलारी, अ‍ॅड.अक्षय काळे, महेश कराळे, गणेश कराळे, बाळासाहेब खताडे, बाळासाहेब भुजबळ, तात्याराव क्षीरसागर, विष्णु कुलकर्णी, अर्थव सप्तर्षी आदींसह नगर, बीड, जालना जिल्हा मधील वीस हुन अधिक गोशाळा प्रतिनिधी व दोनशेहुन अधिक गोरक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक गौतम कराळे यांनी केले. सूत्रसंचालन ललित चोरडिया यांनी केले. तर आभार श्रीहरी महाराज घाडगे यांनी मानले. वर्धमान संस्कार धाम मुबंईच्या भगवान महावीर जीवदया निवारा शेड निर्माणासाठी अठरा लाख रु. मदत करण्यात आली. भविष्यात तिनशे अधिक गोवंश राहतिल असे भव्य शेड तयार करण्यात आले आहे.