अभिषेक कळमकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीची वाजवली तुतारी

0
78

माजी महापौर व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अचानक आदल्या रात्री त्यांच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी आपण आमदारकीला उभे राहावे, अशी मागणी केली, त्यासाठी त्यांनी पक्षाचे चिन्ह तुतारी पण वाजवली. कळमकर यांच्या इथे कार्यकर्ते वाद्य व तुतारी घेऊन आले. त्यांनी कळमकर यांचे अभिष्टचिंतन केले व त्यांच्या घराबाहेर वाद्याच्या गजरात आतषबाजी करत तुतारी वाजवली. त्यांचा वाढदिवस साजरा केला व निवडणुकीस उभे राहावे, अशी मागणी केली.