मिशन १३ मे – सण मतदानाचा! : सहा स्पर्धांचे आयोजन

0
44

नगर – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी १०० टक्के मतदानाची भूमिका बजवावी त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी प्रदीप पाटील (तहसीलदार – निवडणूक) यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद,शिक्षण विभागाच्यावतीने मिशन १३ मे – सण मतदानाचा या नाविन्यपूर्ण सहा स्पर्धांचा समावेश असलेल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी सहभागी व्हावे व मतदानामध्ये देखील सहभागी व्हावे असे आवाहन स्वीप समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. निबंध, चित्रकला, कविता, घोषवाय, पोस्टर, मतदान प्रबोधनात्मक व्ही. डी.ओ. (लघुपट /माहितीपट) निर्मिती; अशा स्वरूपाच्या सहा प्रकारच्या स्पर्धा एकूण चार गटात या स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धांसाठी १) पाचवी ते सातवी २) आठवी ते दहावी ३) अकरावी ते पदवीधर ४) खुला गट असे चार गट आहेत. विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. सर्व गटांसाठी निबंध स्पर्धांचे विषय पुढीलप्रमाणे १) मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य २) लोकशाही आणि मतदानाचा हक्क ३) चला मतदानाला ३) मतदार राजा जागा हो ४) माझे आई-वडील मतदानाला जाणारच. घोषवाय व कविता स्पर्धेसाठी विषय- मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो., मी अहमदनगर आहे- मी माझ्यासाठी मतदान करणार., छोडकर अपने सारे काम.. चलो करो पहिले मतदान चित्रकला व पोस्टर स्पर्धे साठी

विषय- १)मतदान केंद्र -भारताचे शक्तिस्थान २) मतदार जनजागृती ३) अहमदनगरच्या मतदार राजा जागा हो,१३ मे ला लोकशाहीचा धागा हो. सहभागी होणार्‍या स्पर्धकांनी आपल्या साहित्यावर स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता ,फोन नंबर व गटाचा उल्लेख करून आपले स्पर्ध साहित्य ३० एप्रिल २०२४ पर्यंत जिल्हा परिषद,माध्यमिक शिक्षण विभाग, अहमदनगर या ठिकाणी समक्ष / पोस्टाने/कुरिअरद्वारे जमा करावयाचे आहे.तसेच वरीलपैकी कुठल्याही एक विषयावर व्हिडिओ व लघुपट निर्मिती करावयाची असून देशातील पहिल्या अहमदनगर स्वीप केअर असलेल्या ९००२ १० ९००३ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर व्हिडिओ व लघुपट पाठवायचे आहेत. जास्तीत जास्त शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक यांनी या मिशन १३ मे- सण मतदानाचा! उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन राहुल पाटील (उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी), अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी), मीना शिवगुंडे (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), प्रदीप पाटील (तहसीलदार- निवडणूक), बाळासाहेब बुगे (उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार), डॉ.अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत)व सर्व स्वीप समिती सदस्य आदींनी केले आहे.