इंपिरियल,मार्केट यार्ड, जीपीओ चौकातील जंबो हायमास्ट बंद

0
20

अहमदनगर शहरात नव्याने झालेल्या उड्डाणपुला खालील ६ चौक (सक्कर, स्वस्तिक, इंपीरियल, मार्केट यार्ड, कोठी, चांदणी, जनरल पोस्ट ऑफिस) चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने ३० मीटर जंबो हायमास्ट बसवले. या मार्गावरील विद्युत देखभाल, दुरुस्ती, पथदिवे चालू बंद करणे, विद्युत देयकाचा खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडे आहे. इम्पीरियल, मार्केट यार्ड चौक तसेच जीपीओ या ३ चौकामधील जंबो हायमास्ट गेल्या महिनाभरापासून बंद आहेत त्यामुळे या भागातील चौकात अंधाराचे साम्राज्य पसरले असून अपघाताची शयता आहे तरी सदर जंबो हायमास्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी त्वरित दुरूस्त करावे अशी मागणी येथील व्यवसायिक करत आहेत.