धारदार सुरा घेऊन फिरणाऱ्या युवकाला पकडले

0
43

नगर – दुचाकीत धारदार सुरा घेऊन फिरणार्‍या युवकाला भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले आहे. विशाल विष्णू मुसळे (वय १८ रा. मोहटादेवी मंदिराच्या पाठीमागे, भिंगारदिवे मळा, भुतकरवाडी) असे पकडलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून धारदार सुरा जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात आर्म अ‍ॅट कलमानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पथक गस्त घालत असताना सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना माहिती मिळाली की, एक युवक त्याच्या दुचाकीत धारदार सुरा घेऊन भूईकोट किल्ला मैदानाजवळील काटवनात अनुचीत प्रकार करण्याच्या बेतात आहे, माहिती मिळताच सहायक निरीक्षक राजगुरू यांनी पोलीस अंमलदार संदीप घोडके, संदीप शिंदे, संदीप थोरात, आव्हाड, कैलास शिरसाठ यांना कारवाई करण्याबाबत सूचना दिली. पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावून संशयित युवकाला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव विशाल विष्णू मुसळे असे सांगितले. त्याच्याकडून धारदार सुरा जप्त केला आहे.