बलिदानमासनिमित्त रक्तदान हे समाजाकरीता प्रेरणादायी ठरेल : बापू ठाणगे

0
15
UNJ

 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहिल्यानगरच्या वतीने शिबीर १५४ पिशव्याचे रक्तसंकलन

नगर – धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देताना ज्या यातना सोसल्या हिंदु धर्मासाठी बलिदान दिले. छत्रपती संभाजी राजांचे बलिदान हे अटक केलेल्या क्षणा पासुन ते मरे पर्यत छत्रपति संभाजी महाराजांनी ज्या यातना सहन केल्या त्याची कल्पना आपण करू शकत नाही. त्याचे बलिदान हे सामान्य नाही. संभाजी महाराजांचे बलिदान हे धर्मासाठी झालेले आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी केलेले बलिदान आणि त्या बद्दलची कृतज्ञता म्हणुन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळतो शंभुराजांना ४० दिवस ज्या काही वेदना झाल्या याची जाणीव आपल्याला व्हावी बलिदासमासानिमित्त रक्तदान हे समाजाकरीता प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नगरजिल्हा प्रमुख बापू ठाणगे यांनी केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहिल्यानगरच्या वतीने भव्य रक्तदान शिबीरास प्रतिसाद लाभला.

तेलीखुंट येथील विठ्ठल रुमिणी मंदिर, संत संताजी भवनात धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहिल्यानगरच्या वतीने रक्तदान शिबीराप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना वेदमुर्ती सिध्देश्वर शास्त्री निसळ गुरुजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नगरजिल्हा प्रमुख बापू ठाणगे, दिगंबर गेण्टयाल, विनोद काशिद, अनिकेत शिंदे, रवि परदेशी, निलेश चव्हाण, अमोल हुंबे, भरत शिंदे आदी उपस्थित होते. तेलीखुंट येथील १५४ पिशव्याचे रक्तसंकलन केले. ग्रामीण भागातील वाकोडी, जेउर, निबोंडी, निमगाव वाघा येथेही धारकरी बंधूनेही रक्तदान झाले. मोठया संख्येने धारकरी व शिवप्रेमींनी या पवित्र कार्यात सहभाग नोंदवला दोनशे पानी संभाजी महाराजांची चरीत्र प्रत्येक रक्तदात्यास भेट देण्यात आले.