तारकपूर बसस्थानकाबाहेर कट्‌ट्यासह तरुणाला पकडले

0
27

नगर – नगर शहरातील तारकपूर बस स्थानकाबाहेर रस्त्यावर एका तरुणाला गावठी कट्टा बाळगताना पोलिसांनी पकडले आहे. विशाल पांडुरंग बोरुडे (वय २५, रा. वारुळाचा मारुती वीट भट्टी जवळ नालेगाव, मूळ रा. वाघवाडी, ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. रविवारी (दि.७) रात्री १०.३५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. तारकपूर बसस्थानक परिसरात एक तरुण गावठी कट्टा जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. या माहिती वरून पोलिसांचे पथक तारकपूर बसस्थानक परिसरात रवाना झाले व त्यांनी संशयित तरुणाचा शोध सुरु केला. काही वेळातच त्यांना विशाल बोरुडे हा बस स्थानका बाहेर रस्त्यावर संशयित रित्या उभा असलेला दिसला. पोलिसांनी त्याला जागेवर पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या कडे गावठी बनावटीचे एक स्टीलचे पिस्टल आढळून आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध पो.हे.कॉ. सतीश भवर यांच्या फिर्यादी वरून भारतीय शस्र अधिनियम ३ / २५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.