हाजी हसन शहा कादरी कब्रस्तान परिसराची स्वच्छता करून रस्त्यावर मुरूम टाकावा

0
47

मनपाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम अर्धवट, ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर, धार्मिक स्थळावर जाण्यासाठी अडथळा

नगर – अहमदनगर कॉलेज येथील विद्युत महावितरण कार्यालया शेजारी असलेल्या हाजी हसन शहा कादरी कब्रस्तान येथे अनेक भाविक दर्शनासाठी ये जा करत असून या ठिकाणी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु अर्धा रस्ता पूर्ण होऊन अर्धा रस्ता खोदलेल्या परिस्थितीत आहे त्यामुळे तेथे ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रमजान सण असल्याने येथे मुस्लिम समाज बांधव हे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी व नमाज पठण करण्यासाठी येतात त्यामूळे कब्रस्तान परिसर स्वच्छ करण्यात यावा व सदर परिसरात औषध फवारणी करुन व रस्त्यावरील जे ड्रेनेज व घाण पाणी साचलेले आहे हे पाणी काढण्यात येऊन त्यावर मुरूम टाकण्यात यावा व या परिसर रमजान ईद च्या अगोदर स्वच्छ करून तेथे औषध फवारणी करून कब्रस्तान पुढील रोडवरील ड्रेनेज तसेच घाण पाणी साठलेले आहे त्यावर मुरूम टाकून साफ करून देण्याची मागणी स्वप्निल शिंदे यांनी केली आहे. घाण पाणी साचलेल्या रस्त्याची पाहणी करताना स्वप्निल शिंदे, मतीन शेख, मोबीन शेख, अरेंज शेख, परवेज शेख, अब्रार शेख, अफ्फान शेख, उझेर शेख, मोसीन शेख, अली शेख, आकाश कोरे, वैभव पारधे, विशाल झेंडे, गौरव उजगरे, सोनु आंग्रे, अनिकेत पारधे आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.