शिवरस्त्याच्या वादातून नगरमध्ये एकाचा खून

0
67

नगर – शेतातून जाणार्‍या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुयातील वाळकी गावच्या शिवारात गुरुवारी (दि.४) सकाळी घडली. मोहन खिराजी दांगडे (वय ६५, रा. हंगदरा मळा, वाळकी, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. वाळकी गावच्या शिवारात हंदार मळा तलाव असून या तलावालगत दांगडे वस्ती तसेच तेथून काही अंतरावर तिरमले वस्ती आहे. या वस्तीकडे जाण्यासाठी तलावाजवळून रस्ता आहे. गुरुवारी (दि.४) सकाळी तिरमले वस्ती वरील एकाबरोबर मोहन दांगडे यांचा वाद झाला. या वादाचे पर्यावसन पुढे हाणामारीत झाले. यामध्ये दांगडे यांना लाकडी दांडयाने जबर मारहाण करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉटरांनी त्यांना मयत घोषित केले. ही माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पोलिस पथकासह जिल्हा रुग्णालयात धाव घेत मृताच्या नातेवाईकांकडून व तेथे उपस्थित वाळकीच्या काही नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील डॉटरांच्या खबरेवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.