महावीर जयंतीला सर्व कत्तलखाने, मांस विक्री बंद ठेवण्यात यावी

0
23

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे अहमदनगरमधून निवेदनाद्वारे मागणी

नगर – महावीर जयंतीला भारतातील सर्व कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्यांत यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा व श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ, जैन मंदीर कापडबाजार, नगरचे मुख्य ट्रस्टी सुभाषलाल मुथा यांनी केली आहे निवेदनात म्हटले आहे की, २१ एप्रिल रोजी जगाला शांतीचा व अंहिसेचा संदेश देणारे श्री भगवान महावीर स्वामींची जयंती (जन्मकल्याणक) आहे त्या निमित्ताने भारत देशात व महाराष्ट्र राज्यात सालाबाद प्रमाणे त्या दिवशी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील, शहरातील, उपनगरातील तसेच भिंगार येथील सर्व कत्तलखाने व मांस विक्री संपूर्ण दिवस बंद ठेवण्यांत यावी याबाबत लेखी आदेश त्वरीत द्यावा व सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, आयुक्त, महानगरपालिका याना देण्यात आल्या आहेत.