वृक्षाची माहिती व फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवून शहरात ‘जनजागृती’ करणार : महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे

0
59

‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत बैठकित विविध उपाययोजना

नगर – राज्य शासनाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान सुरू असून हे अभियान पंचमहाभूतांवर म्हणजे पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी यावर काम करून पृथ्वीचे तापमान कमी करण्याचे उद्दिष्ट अहमदनगर मनपाने ठेवले असून त्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण व संवर्धन मोठ्या प्रमाणात करणार आहे, तसेच नागरिकांमध्ये वृक्षाची माहिती व फायदे या संदर्भात जनजागृती केली जाईल त्यामुळे नागरिक नक्कीच वृक्षाची काळजी घेतील व पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी करण्याचे उद्दिष्टे सफल होईल, नागरिकांनी देखील या अभियानामध्ये भाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने माजी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित बैठकीत डॉ. पंकज जावळे यांनी उपाययोजना संदर्भात विविध सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंढे, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, इंजिनिअर गणेश गाडळकर, विद्युत विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, इंजिनिअर जयेश कोके आदी उपस्थित होते. उपायुक्त विजयकुमार मुंढे म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हरित पट्टे वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहे, तसेच नगरकरांना बरोबर घेऊन वृक्ष संवर्धनाची लोकचळवळ उभी केली जाईल रोपवाटिकेची निर्मिती केली जाईल, महानगरांमध्ये वायु प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहे, यावर उपाययोजना करण्यासाठी काम सुरू आहे, प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा यासाठी समाजामध्ये जनजागृती केली जाईल, याचबरोबर इलेट्रिक वाहन वापरासाठी नागरिकांना माहिती दिली जाईल, जल संसाधन संवर्धन आणि पुनर्जीवन करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, पिण्याचे शुद्ध पाण्याचा वापर आणि बचत यावरती काम केले जात आहे, पावसाचे पाणी जागेवरच पर्युलेशन व्हावे यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्डे वापराकडे नागरिकांनी वळावे, सार्वजनिक आणि खाजगी इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल असे ते म्हणाले, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे म्हणाले की, माझी वसुंधरा अभियान शहरांमध्ये यशस्वीपणे राबवण्यासाठी शहरातील मंडळ विद्यार्थी नागरिक महिला यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे, याचबरोबर शाळांना देखील सहभागी करून घेतले जाणार आहे, पर्यावरण समतोलासाठी महापालिकेच्या माध्यमातून वृक्षरोपण व संवर्धनाची लोक चळवळ उभी राहण्यासाठी आयुक्त यांच्या मार्गदर्शनासाठी काम सुरू आहे असे ते म्हणाले.