विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हामंत्रीपदी उद्योजक अनिल जोशी यांची निवड

0
15

नगर – नेवासा तालुयातील वडाळा बहिरोबा येथील विभाग बैठकीत केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्री पदी शहरातील उद्योजक अनिल जोशी यांची निवड करण्यात आली. यावेळी अनिरुद्ध पंडित, सतीश अरगडे, सुनील खिस्ती, गजेंद्र सोनवणे, कुणाल भंडारी, श्रीकांत नंदापुरकर आदी उपस्थित होते. अनिल जोशी यांचे वडील सैन्यात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण नगरमध्ये झाले. पहिली ते दुसरीपर्यंतचे शिक्षण नगर शहरातील मध्यवर्ती शाळेत झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नौदलात निवड झाली आणि पंधरा वर्षे नौदलात सेवा केली. सन २००० मध्ये नौदलातून निवृत्त झाल्यानंतर २००७ पर्यंत परदेशात काम केले. त्यानंतर भारतात परत येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदर्शांनी प्रभावित होऊन संघाच्या संपर्कात आले आणि संघात काम करू लागले. संघाच्या अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषदचे ते सदस्य असल्याने त्यांची संघाच्या अखिल भारतीय पूर्वसैनिक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली.