सीसीटीव्ही कॅमेर्यासह डिव्हीआरही पळवला
नगर – नगर तालुयातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिरात मंगळवारी (दि.२) पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा धाडसी चोरी झाली आहे. या मंदिरात चोरी होण्याची ही चौथी वेळ असून ग्रामदैवत असलेल्या मंदिरात चोरीची घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामातेचे मंदिर उंच टेकडीवर आहे. येथे यापूर्वी तीन ते चार वेळेस चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. मंगळवारी पहाटे पुन्हा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. मंदिरातील सागवानी दरवाजा काठीच्या सहाय्याने उघडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्यासहित सर्व साहित्य, ध्वनीक्षेपक यंत्र, समई व तांब्यांच्या कलशाची चोरी करण्यात आली आहे. बायजामाता मंदिरात यापूर्वी चोरीचा घटना घडल्याने तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्याचे सर्व साहित्य घेऊन पोबारा केला आहे. घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञांची टीम पाचारण करण्यात आली होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस उपनिरीक्षक उदयसिंग मोहारे, पो.हे.कॉ.रमेश थोरवे, राजू सुद्रिक, नंदकिशोर सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल भगवान वंजारी यांनी भेट देऊन पाहणी केली.
घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी जेऊर येथे भेट देऊन पोलिसांशी चोरी बाबत चर्चा केली. तसेच यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले. तपास कामी ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन कर्डिले यांनी केले आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक मधुकर मगर, सुनील पवार, बाबासाहेब तोडमल, उपसरपंच दिनेश बेल्हेकर, बंडू पवार, विजय पाटोळे, देवीचे भगत राम म्हस्के, सचिन म्हस्के, विकास म्हस्के, नारायणदादा तोडमल, गंगाधर बेल्हेकर, राजेंद्र ससे, प्रशांत कटारिया, बबलू म्हस्के, मनोज कोथिंबीरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सदर चोरी प्रकरणाचा तपास पोलिसांनी लवकरात लवकर लावावा. यापूर्वीही बायजामाता मंदिरात चोरीच्या घटना घडल्या असून दानपेटीतील पैसे चोरीला गेलेले आहेत. बायजामाता देवस्थान पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. अशाप्रकारे मंदिरात होणार्या चोर्यांवर आळा बसणे गरजेचे आहे, अशी मागणी मंदिर जीर्णोद्धार समिती सदस्य नारायण तोडमल यांनी केली आहे.