सावेडी उपनगरात घरासमोर लावलेल्या कारची चोरी

0
100

नगर – घरासमोर उभी केलेली मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर कार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.१) पहाटे २ ते सकाळी ६.१५ वाजण्याच्या दरम्यान सावेडी उपनगरातील भैरव पार्क येथे घडली आहे. याबाबत अमोल पांडुरंग खेडकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. खेडकर यांची मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम.एच.१२ एन पी ३१९९) त्यांनी रविवारी (दि.३१) रात्री घरासमोर उभी केली होती. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.