केडगाव देवी येथे हनुमान चालीसा, भजन संध्याला भाविकांचा प्रतिसाद

0
22

नगर – जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीने उद्योजक सचिन कोतकर यांच्या मार्गदर्शनाने केडगाव रेणुका माता मंदिर येथे श्री दक्षिण मुखी हनुमान सत्संग मंडळ सर्जेपुरा यांच्या सहकार्याने २६ मार्च रोजी हनुमान चालीसा पठण आणि भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा प्रारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा जगताप यांच्या हस्ते श्री रेणुका माता देवीची आरती करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये रामजी की निकली सवारी, प्रभू श्रीराम, बोल बजरंग बली की जय, पवनपुत्र हनुमान, देवी रेणुका माता, मोहटादेवी, जय राम श्रीराम जय जय राम यांसह अनेक हिंदी मराठी भक्ती गीत या ठिकाणी सादर करण्यात आले. यावेळी हनुमान यांची वेशभूषा परिधान करून भक्ती गीतांवर नृत्य सादर केले यामध्ये विविध भक्ती गीतांवर उपस्थित असलेल्या भाविकांनी नृत्य करण्याचा आनंद घेतला महिला भाविक यांनी देखील प्रभू श्रीराम यांच्या भक्ती गीतांवर नृत्य सादर केले.

अरुण जगताप यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी रेणुका मातेची महाआरती तसेच हनुमान चालीसा घेण्यात आली व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अजित कोतकर म्हणाले की अरुण जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हनुमान चालीसा पठण कार्यक्रम केडगाव देवी परिसरात घेण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा जगताप, माजी सभापती मनोज कोतकर, बच्चन कोतकर, सोनु घेंबूड, पंकज जपे, इंजिनिअर प्रसाद आंधळे, जालिंदर कोतकर, महेंद्र कांबळे, अशोक कराळे, अण्णा शिंदे, नवनाथ कोतकर, भैरू कोतकर, अजित कोतकर, बंटी विरकर, अजिंय कोतकर, विजय सूंबे, विशाल पाठक, सुहास साळके, शुभम साके, अनिकेत कोतकर, माऊली जाधव, बापू सातपुते, सार्थक लांडे, नितीन ठुबे यांसह भक्त जन उपस्थित होते.