अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त काल्याचे कीर्तन
नगर – मनुष्याने कोणतेही काम करत असताना त्या कामांमध्ये ध्येय ठेऊन काम केल्यास ते काम सिद्धेश किंवा फळास जाते. त्या कामांमध्ये एक- एक पायरी पाहणं किंवा एक-एक पायरी आपल्या मनात बसवणं म्हणजेच वेड होणं प्रपंचात परमार्थ व इतर जी माणसं कोणालाही कुठेही उत्तर द्यायला तयार होतात ती माणसं आपला अज्ञानाचा परिचय करून देतात. जी माणसं सुज्ञ असतात जी जाणारी असतात ती माणसं आपल्या कामांमध्ये कमी बोलतात आणि लोकांना उत्तर देण्यापेक्षा आपले दोन बोटं घ्यायची आणि दोन्ही कानात घालायचे जो मनुष्य परमार्थ करतो त्याने जर आपली बोटं कानात घालून परमार्थ केला तर त्याचा परमार्थ यशस्वी होतो. संसारात आपली कुटुंब व्यवस्था करत असताना इतर लोकांचे न ऐकता आपली कुटुंब व्यवस्था चालवणं. दोन बोट आपल्या कानात घालून केलेला संसार उत्तम ठरतो हे सर्व न करता जी माणसं उत्तर द्यायला लागली ती माणसं लगेच बरबाद होतात. तुकाराम महाराजांनी कधी लोकांना उत्तर दिले नाही स्वतःचा परमार्थ सिद्धीस नेला आणि जो लोकांचे उत्तर देण्यात जातो त्याचे जीवन तसेच राहून जाते. हजार लोकांचे हजार प्रश्न असतात त्या सर्वांचे उत्तर देण्यात आपले जीवन निघून जाते ज्या मनुष्याला लोकांनी केलेली निंदा थोडीही सहन होत नाही ती मनुष्य परमार्थ किंवा राजकारण किंवा इतर गोष्टी करू शकत नाही.
जसे गौळण भगवान श्रीकृष्णाचे भजन करू लागली त्यावेळी लोक तिच्यावर समाज हसू लागले तिला बोलू लागले त्यावेळी तिने दोन बोट आपले कानात घातले आणि भगवंताचे भजन करू लागली. त्या लोकांकडं लक्ष दिलं नाही त्यामुळे तिचा परमार्थ सिद्धेश गेला ते तुकोबाराय सांगतात तुका म्हणे हासे जण ॥ नाही कान तया ठाई ॥ याप्रमाणे या वृत्ती प्रमाणे जर आपण काम करत असताना इतर लोकांकडं लक्ष न देता आपलं कामावर आपलं लक्ष दिलं तर आपलं ते काम सिद्धेश किंवा पूर्णतेकडे जातो, असे प्रतिपादन जंगले महाराज शास्त्री यांनी केले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी व माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त ह.भ.प. पुंडलिक जंगले महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले. यावेळी शिवाजीराव कर्डिले, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, माजी नगरसेवक रामदास आंधळे, वसंत लोढा आदींसह नागरिक भक्तगण उपस्थित होते. बाबासाहेब वाकळे म्हणाले की, संत तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्त सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या माध्यमातून समाजामध्ये अध्यात्मिकता व धार्मिकतेचे प्रबोधन होत असते या कार्यक्रमासाठी नागरिक सात दिवस उपस्थित राहतात. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. असे ते म्हणाले.