रात्री घरासमोर ओट्यावर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्याने पळविले

0
67

नगर – सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि रात्रीच्या वेळी उकाडा वाढत असल्याने घराबाहेर असलेल्या ओट्यावर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण एका अनोळखी चोरट्याने हिसका मारून तोडून नेल्याची घटना नगर तालुयातील कामरगाव शिवारात असलेल्या महानुभाववाडी येथे बुधवारी (दि.२७) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत वर्षा अविनाश दळवी (वय ३९, रा. महानुभाववाडी, कामरगाव, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सध्या उकाडा वाढू लागल्याने फिर्यादी दळवी या मंगळवारी (दि.२६) रात्री घराबाहेरील ओट्यावर झोपलेल्या होत्या. तर त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य घरात झोपलेले होते. बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास त्यांना आपल्या गळ्यातून कोणीतरी दागिने ओढत असल्याचे जाणवले, त्यामुळे त्या झोपेतून जाग्या झाल्या. त्यावेळी एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसका मारून तोडले व ते घेवून तो पळून जाऊ लागला. त्यावेळी फिर्यादी दळवी यांनी आरडा ओरडा केला. मात्र घरातील सदस्य व शेजारी पाजारी जमा होईपर्यंत चोरटा अंधाराचा फायदा घेवू पसार झाला होता. याबाबत त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा. दं. वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.