दैनिक पंचांग बुधवार, दि. २७ मार्च २०२४

0
79

संत तुकाराम महाबीज, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष, चित्रा १६|१६
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष:  नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे
सफल होतील. व्यवसाय क्षेत्रात अधिकारी व सहकारी नकारात्मक वागतील.

वृषभ: आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा
प्रयत्न करा. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील.

मिथुन: मोठ्यांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात
असलेल्या संततीच्या शुभवार्ता मिळतील. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

कर्क: विशेषतः धंदा-व्यवसाय करण्यार्‍यांना आज फारच लाभदायक दिवस
आहे. मित्राच्या भेटीतून आनंद मिळेल. अजीर्णचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन यात
रस वाटेल.

सिंह : भेटीचे योग येतील. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास होतील. काम
करायला उत्साह वाटणार नाही. मित्र व स्नेही भेटल्यामुळे आनंदात असाल.

कन्या : रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर
संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील.

तूळ: आज नवीन कामे सुरू करू नका. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार
नाहीत. सरकार विरोधी कारवायांपासून दूर राहणच आज फायदेशीर होईल.

वृश्चिक : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल.
आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च
होईल.

धनु : प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. चर्चा- वादविवाद यातही तुमचा प्रभाव राहील.
कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसे ल. धनआणि किर्तीची हानी होईल. प्रतिस्पर्ध्यांपासून
सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.

मकर : हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता.
आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. दोघांपैकी एकाचे स्वास्थ्य
बिघडणार नाही याकडे लक्ष द्या.

कुंभ : आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे यावेळी
आपल्यासाठी फलदायी आहे. कामात सांभाळूनच पुढे चला. कोर्ट कचेरीपासून दूरच
राहा.

मीन : जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये
स्थिती सुखद राहील. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. भागीदाराबरोबर
सुद्धा मतभेद होऊ शकतात.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.