स्वीप समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागातर्फे मतदार जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

0
44

नगर – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिडी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी १००% मतदानाची भूमिका बजवावी त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने लोकशाहीचा उत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्याथी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात लोकशाहीचा उत्सव उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे व मतदार जनजागृतीबरोबरच मतदानामध्ये देखील सहभागी व्हावे असे आवाहन स्वीप समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. निबंध, चित्रकला. घोषवाय, पोस्टर, मतदान प्रबोधनात्मक व्ही.डी.ओ.. लघुपट निर्मिती अशा स्वरूपाच्या सहा प्रकारच्या स्पर्धा एकूण चार गटात या स्पर्धा संपन्न होणार आहेत. या सर्व स्पर्धासाठी १) पाचवी ते सातवी २) आठवी ते दहावी ३) अकरावी ते पदवीधर ४) खुला गट असे चार गट आहेत. विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. सर्व गटांसाठी निबंध स्पर्धाचे विषय पुढीलप्रमाणे १) मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य २) लोकशाही आणि मतदानाचा हक्क ३) चला मतदानाला ३) मतदार राजा जागा हो ४) माझे आई-वडील मतदानाला जाणारच. घोषवाय स्पर्धेसाठी विषय मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो.चित्रकला व पोस्टर स्पर्धेसाठी विषय- १) मतदान केंद्र भारताचे शक्तिस्थान २) मतदार जनजागृती ३) मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. सहभागी होणार्‍या स्पर्धकांनी आपल्या साहित्यावर स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर व गटाचा उल्लेख करून आपले ३० एप्रिल २०२४ पर्यंत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, अहमदनगर या ठिकाणी समक्ष / पोस्टाने/कुरिअरद्वारे जमा करावयाचे आहे. वरीलपैकी कुठल्याही एक विषयावर व्हिडिओ व लघुपट निर्मिती करावयाची असून या ९००२१०९००३ व्हाट्सअप क्रमांकावर व्हिडिओ व लघुपट पाठवायचे आहेत, असे आवाहन राहुल पाटील (उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी), प्रदीप पाटील (तहसीलदार- निवडणूक), अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी-माध्य. जि.प. अहमदनगर), भास्कर पाटील (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारीय्प्राथ.जि.प. अहमदनगर), स्वीप समिती सदस्य बाळासाहेब बुगे (उपशिक्षणाधिकारी जि.प. अहमदनगर), डॉ. अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत) व सर्व स्वीप समिती सदस्य यांनी केले आहे.