‘लोकसभा निवडणुकी’संदर्भात खोटे संदेश तसेच फेकन्युजची माहिती देण्यासाठी स्वतंत्र क्रमांक जाहीर

0
26

नगर – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कालावधीमध्ये उमेदवारांची प्रचारा दरम्यान बदनामी करणे, अफवा पसरविणे, द्वेषपुर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाद्वारे प्रसारित होणार्‍या फेकन्युजची माहिती जनतेकडून मिळण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला असुन त्याचा क्रमांक ९१५६४३८०८८ असा असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे. या क्रमांकावर जनतेकडून मिळालेल्या माहितीची नियंत्रण कक्षातील प्रभारी नियंत्रण अधिकार्‍यांनी पोलिस निरीक्षक (सायबर) यांच्या मदतीने शहानिशा करुन आवश्यक ती कारवाई करावी, असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.