उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नगर शहर विधानसभा मतदारसंघ समन्वयकपदी दत्ता जाधव यांची नियुक्ती

0
27

नगर – शिवसेना (ठाकरे गट) च्या शहर विधानसभा मतदार संघाचे समन्वयक म्हणून दत्ता जाधव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख गिरिष जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, अशोक दहिफळे, संदिप दातरंगे, गौरव ढोणे, मयुर मैड, बाबू कावरे, सुरेश तिवारी, अरुण झेंडे, मृणाल भिंगारदिवे, सुमित धेंड, मिलनसिंह जुनी, प्रताप गडाख, संजय सागावकर, अण्णा घोलप, महेश शेळके, श्याम सोनवणे आदि उपस्थित होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख आ.सुनिल शिंदे यांच्या मान्यनतेने जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या सहीने हे पत्र दत्ता जाधव यांना शिवालय येथे देण्यात आले. यावेळी संभाजी कदम म्हणाले, हिंदूत्वाशी आणि मराठी माणसाशी एक अतुट नाते शिवसेना प्रमुखांनी सर्वांशी जोडले, म्हणून त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणून गौरविण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आपल्या सारख्या कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचा वसा घेऊन संघटनेची वाटचाल सुरु आहे. त्यात नगर शहर विधानसभेच्या समन्वयक पदी दत्ता जाधव यांची निवड करुन संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विक्रम राठोड म्हणाले, गावा-गावात शिवसेना उभी करतांना अनेक संकटांना धैर्याने सडेतोड उत्तर दिले. संघटनेचे कार्य जोमाने सुरु आहे. त्यामुळे शिवसेना सर्वांपर्यंत पोहचली आहे. आपल्यातील धगधगता हिंदूत्वाचा बाणा घेऊन युवा शक्तीच्या माध्यम ातून शिवसेना मजबूत करण्यासाठी दत्ता जाधव यांच्यासारखे कार्यकर्ते समन्वयक म्हणून चांगली भुमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी दत्ता जाधव म्हणाले, शिवसेना उपनेते स्व.अनिल राठोड यांनी नगर शहरात शिवसेना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविली आहे. त्यांचा आदर्श घेऊन नगरमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते काम करत आहेत. विधानसभेत पुन्हा शिवसेनेचा आमदार करण्यासाठी पक्षाची मोर्चे बांधणी सुरु असून, त्याचाच एक भाग म्हणून आपली समन्वयक पदी निवड केली असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन शिवसेनेशी लोकांना जोडण्याचा आपण प्रयत्न करु, असे सांगितले.