पक्षपातीपणा आमच्या रक्तातच नाही : शांताबाई शिंदे

0
56

सुवर्णानगरमधील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

नगर – शहराबरोबरच उपनगरे झपाट्याने वाढत असून, विकसित होत आहेत. प्रभागातील नागरिकांनी समस्या आमच्याकडे मांडल्यानंतर त्याच वेळी त्या मार्गी लावण्यावर आमचा भर असतो. नागरिकांनी सुचवलेली विकासकामे प्राधान्याने पूर्ण केली. लोकप्रतिनिधीकडे नागरिक प्रभागाचा आयकॉन म्हणून अपेक्षा ठेवतात. त्याची पूर्ती करणे हे आमचे कर्तव्य मानते. विकासकामे करून प्रश्न सोडवताना यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपण करत नाही. पक्षपातीपणा आमच्या रक्तातच नाही. सहकार्यातून झालेली विकासकामे व त्यामुळे विकसित झालेली नगरी जनतेच्या चिरकाल स्मरणात राहते, असे प्रतिपादन माजी नगरसेविका शांताबाई शिंदे यांनी केले. केडगावमधील सुवर्णानगर येथे अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. योवळी नगरसेवक विजय पठारे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, सोनवणे, मीनाक्षी औटी, कोतकर, ओहळ, गीता गंधे, रूपा गावंडे, कुलकर्णी, इनामदार, केदारे, शिंदे, मीनाक्षी खिलारी, डेंगळे, मोहन कोतकर, संजय ओहोळ, रघुनाथ सोनवणे, संभाजी शिंदे, विजय भोर, रवी गावंडे, बबन डेंगळे, भाऊसाहेब खिलारी, देशपांडे, दत्तात्रय शिंदे, आवटी, बेळगेकर, किसन धोत्रे, शिवाजी दिवटे, पारधे, गंधे, दीपक डेंगळे, विराट जंगम, भाऊ घुले यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाल्या की, माझ्या कार्यकाळात जनतेने सुचवलेली व मंजुरीसाठी पाठवलेल्या कामांना मंजुरी मिळून वर्क ऑर्डर निघत आहे. प्रलंबित कामे मार्गी लावून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करते आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्वच कामे मार्गी लावली जातील. प्रभागातील जनतेने माझ्यावर विश्वासाने टाकलेली जबाबदारी पार पाडत आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कोतकर यांनी केले, तर आभार विराट जंगम यांनी मांडले.