ज्युनिअर महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेत अभय चव्हाणने पटकाविले रौप्य पदक

0
29

नगर – शहरातील अभय चव्हाण याने ज्युनिअर महाराष्ट्र श्री राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. त्याची गोवा येथे होणार्‍या ज्युनिअर राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. पुणे येथे राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. चव्हाण याने अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ६५ किलो वजन गटात रौप्य पदकाची कमाई केली. तो गावा येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. चव्हाण याने राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत पदक पटकाविल्याबद्दल त्यांचा अहमदनगर डिस्ट्रिट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गायकवाड, सचिव मनोज गायकवाड, खजिनदार सोहेल शेख, कार्यकारी अध्यक्ष सद्दाम सय्यद, परीक्षक आयनुल सय्यद, राजू थोरात, आकाश कांबळे आदी उपस्थित होते.