शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांना एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार

0
58

नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील पंपहाउस, सबस्टेशन व मुख्य जलवाहिनी इत्यादी ठिकाणची महत्वाची दुरुस्ती कामासाठी अहमदनगर महानगरपालिकेकडून २० मार्च सकाळी ११ वाजल्यापासून सायं. ५०० वाजेपर्यत शट डाउन घेण्यात येणार आहे. दरम्यान काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाया भरता येणार नाही. त्यामुळे २० मार्च रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहररोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच बुरूडगाव रोड, सारसनगर, कोठी, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास सकाळी ११.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होउ शकणार नाही. सदरचा पाणीपुरवठा हा २१ मार्च रोजी करणेत येईल. तसेच २१ मार्च रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्राखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळु बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हाडको, टि. व्ही सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, विनायक नगर, आगरकर मळा, स्टेशन रोड, कायनेटीक चौक परिसर इ. भागात महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणीपुरवठा हा २२ मार्च रोजी करण्यात येईल.

२२ मार्च रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेज सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, आनंदीबाजार, कापड बाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सारसनगर, बुरुडगांव रोड व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा होणार नसून तो २३ मार्च रोजी करण्यात येईल. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करुन उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे, अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.