ऐन सणासुदीच्या काळात कमी दाबाने पाणीपुरवठा

0
47

नगर – शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ऐन रमजानच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सदर भागातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांना केली आहे. यासंदर्भात शहरातील गवळीवाडा फलटण पोलीस चौकी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, कोठला परिसरातील गल्लीत मागील महिना दीड महिन्यापासून पिण्याच्या पाईपमधून बुडबुडेमिश्रित पाणी अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. पुरेशा दाबाने व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागाला योग्य त्या सूचना देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी या भागातील नागरिक सादिक शेख, इनायत शेख, शेख फरीद, शेख सलमान अली सय्यद, मोहसिन पठाण, मोईन शेख, आमीर पठाण, मुनावर शेख, सोहेल बागवान, रुबेन मकासरे, अब्दुल पठाण, शेख मोहंमद जैद उस्मान आदींनी केली आहे.