नगर-कल्याण महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू

0
38

नगर – भरधाव वेगातील एस टी बस ने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर कल्याण महामार्गावर जखणगाव शिवारात सोमवारी (दि.१८) सकाळी ९.४८ च्या सुमारास घडली. राहुल संजय खोमणे (वय २१, रा. धोत्रे खुर्द, ता. पारनेर) असे मयत युवकाचे नाव आहे. मयत राहुल हा दुचाकीवर नगर कल्याण महामार्गाने नगर कडे येत होता. सकाळी ९.४८ च्या सुमारास जखणगाव शिवारात त्याच्या दुचाकीला एस टी बस ने धडक दिली. त्यात तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नगरला रुग्णालयात हलविण्यात आले मात्र त्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मयत राहुल याच्या पश्चात आई वडील, १ भाऊ, भावजय असा परिवार आहे. या अपघाताबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरा पर्यंत सुरु होती.