एसा भवन राज्यात दिशादर्शक ठरेल : आ. संग्राम जगताप

0
53

एसा स्पोट्‌र्स विकचे पारितोषिक वितरण 

नगर – वाडीया पार्क सारख्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडत असून राज्य सरकार कडून वाडीया पार्क मध्ये आणखी सुविधा आणण्यासाठी निधी आणला. प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कमीत कमी कुठल्या तरी एका प्रकारचा व्यायाम आवश्यक आहे, एसा असोसिएशनचे सभासद एकत्र येऊन वर्षभर विविध उपक्रम राबवत असतात तसेच बांधकाम क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती सभासदांना देण्याचे काम करत असतात या माध्यमातून युवा आर्किटेटस् इंजिनिअर्स यांना प्रेरणा मिळते, त्यांच्या माध्यमातून शहरात नियोजनबद्ध प्रकल्प उभे राहत असून सौंदर्यकरणात भर पडते, शहर विकासात एसा असोसिएशनचा मोठा वाटा असून ते एक महत्वाचा घटक आहे, एसा असोसिएशनच्या माध्यमातून एसा भवन उभारत असून राज्यातील आर्किटेटस् इंजिनीअर्स यांना दिशादर्शक ठरेल असे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले एसा स्पोर्ट्स विकचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश कार्ले, प्रितेश पाटोळे, अन्वर शेख, सभासद असलेले मीनल काळे, इबाल सय्यद, विकार काझी, सुरेश परदेशी, संजय चांडवले, बाबूजी ससाणे, अनिल आठरे, श्रद्धा अंदूरे, वैशाखी हिरे आणि सिनिअर सभासद उपस्थित होते. आर्किटेटस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहमदनगर या संस्थेने मागील सप्ताहात स्पोर्ट्स विकचे आयोजन केले होते. यामध्ये मॅरेथॉन, टेबल टेनिस, स्विमिंग, बॅडमिंटन, चेस, कॅरम, फुटबॉल आणि क्रिकेट अश्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे आणि नेहमी मैदानी खेळत सहभागी राहणे हे निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक असल्याचे क्रीडा समिती अध्यक्ष भूषण पांडव यांनी नमूद केले आणि याच उद्देशाने दर वर्षी संस्था क्रीडा सप्ताहाचे आयोजन करत असल्याचे सांगितले. या स्पोर्ट्स विकचा समारोप क्रिकेट मॅचेसने झाला. क्रिकेटच्या साखळी सामन्यांमध्ये अमेय कुलकर्णी, आदिनाथ दहिफळे आणि ओजस नवले यांनी सामनावीर पुरस्कार मिळाला. सिनियर सभासदांच्या झालेल्या रंगतदार सामन्यात अविनाश कुलकर्णी कप्तान असलेल्या अध्यक्षीय टीमला विजेते पद तर मधुकर बालटे कप्तान असलेल्या टीमला उपविजेतेपद मिळाले. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अरुण गावडे यांना मिळाला. वैभव निमसे यांच्या एसा ब्लास्टर संघाला विजेतेपद मिळाले.

एसा किंग्ज संघाचे कप्तान असलेल्या प्रिन्स फुलसौंदर संघाला उपविजेतेपद तर अमेय कुलकर्णी कप्तान असलेल्या एसा मास्टर संघाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार अमेय कुलकर्णी यांना मिळाला. बेस्ट फलंदाज ओजस नवले, बेस्ट बॉलर आदिनाथ दहिफळे आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार प्रविण शिंदे यांना मिळाला. यश दायमा यांनी संस्थेने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांचे कौतुक करून संस्थेच्या अश्या उपक्रमाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असल्याचा संदेश शहरवाशीयांमध्ये जात असल्याचे नमूद केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्पोर्ट्स कमिटी सदस्य अभिजित देवी, झोहेब खान, जितेश सचदेव आणि अमेय कुलकर्णी यांनी काम पाहिले. या उपक्रमास प्रायोजकत्व दिलेले पोलाद स्टील कंपनीचे यश दायमा आणि सुशांत गव्हाणे उपस्थित होते. या समारंभाचे सूत्रसंचालन अजय दगडे तर आभार प्रदर्शन सचिव प्रदिप तांदळे यांनी केले.