जे काम कोणाकडूनही झाले नाही, ते काम पूर्ण केल्यानंतर उद्‌घाटनासाठी आवर्जून जातो : खा. डॉ. सुजय विखे

0
55

दोन वर्षापासून रखडलेल्या केडगाव येथील पाच गोडाऊनच्या रस्त्याचे लोकार्पण

नगर – सहसा अनेक विकासकामाच्या उद्घाटनाला मी जात नाही. मात्र जे काम कोणाकडूनही झाले नाही, ते काम पूर्ण केल्यानंतर त्या कामाच्या उद्घाटनासाठी आवर्जून जातो. नागरिकांना त्रास होत असताना त्यांची दया येत नसेल, तर अशांमध्ये लोकप्रतिनिधी होण्याची पात्रता नसल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून उद्योजक सचिन (आबा) कोतकर व संदीपदादा युवा मंचच्या पाठपुराव्याने अनेक वर्षांपासून रखडलेल्या केडगाव येथील भैरवनाथ पतसंस्था ते पाच गोडाऊन पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण १४ मार्च रोजी रात्री पार पडला, यावेळी खा. विखे बोलत होते. यावेळी जालिंदर कोतकर, सुनील मामा कोतकर, संदीप दादा कोतकर युवा मंच अध्यक्ष भुषण गुंड, भरत ठुबे, गणेश सातपुते, नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, भरत ठुबे, युवराज कोतकर, धनंजय जामगावकर, माजी नगरसेविका सविता कराळे, सुनीता कराळे, सागर सातपुते, पंकज जहागीरदार, महेंद्र कांबळे, निलेश सातपुते, सुमित लोंढे, अशोक कराळे, गणेश नन्नवरे आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे खा. विखे म्हणाले की, मी कोणाच्या कामात हस्तक्षेप करणारा माणूस नाही. सर्वांना संधी देत असतो.

जो दोन वर्षांपासून रस्ता पूर्ण झाला नाही. तो रस्ता साखर वाटपानंतर पूर्ण झाला. एका महिन्यात संपूर्ण रस्ता नागरिकांसाठी चालू झाला आहे. नागरिक जर खड्ड्यात पडून त्यांना धूळ त्रास सहन करावा लागत असेल आणि लोकप्रतिनिधी काम करत नसतील तर ते लोकप्रतिनिधी होण्याच्या पात्रतेचे नाहीत. आश्वासनांवर मत मागणारा मी लोकप्रतिनिधी नसून, प्रत्यक्षात काम करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. केडगावकरांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल संदीपदादा कोतकर युवा मंच आणि केडगाव ग्रामस्थांच्या वतीने खासदार विखे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.