संत भगवान बाबांचे विचार घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले : रामदास आंधळे

0
32

निर्मलनगर येथे संत भगवान बाबा मंदिर सभा मंडप कामाचा शुभारंभ 

नगर – समाजामध्ये सध्याच्या काळात संतांच्या विचाराची खरी गरज आहे, यासाठी माजी नगरसेवक रामदास आंधळे हे धार्मिक कामासाठी पुढाकार घेत मंदिर व सभामंडपासाठी मदत करत असतात, या माध्यमातून समाज एकत्र येऊन समाज प्रबोधनाचे काम केले जाते, संत भगवान बाबा यांचे विचार घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले आहे. संतांच्या विचारात मोठी ताकद असून निर्मलनगर भागातील संत भगवान बाबा मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे, या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यासाठी समाज बांधव उपस्थित राहत असतात तरी त्यांना सुविधा मिळाव्या म्हणून रामदास आंधळे यांनी मंदिर परिसर सुशोभीकरणाचे काम मार्गी लावले आहे, नागरिकांच्या सहकार्यातून समाजामध्ये चांगले काम उभे राहत असते असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले. निर्मलनगर येथे रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून संत भगवान बाबा मंदिर सभा मंडप कामाचा शुभारंभ भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते झाला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक रामदास आंधळे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, महेश तवले, संपत नलवडे, भीमराज आव्हाड, नितीन शेलार, भाऊसाहेब जावळे, आनंद गीते, अनिल गर्जे, बंटी ढापसे, सिताराम पालवे, लता पालवे, संदीप ढाकणे, चंद्रकला जावळे आदी उपस्थित होते. रामदास आंधळे म्हणाले की, आपली भूमी ही संतांची पावन भूमी असून त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी मंदिरे उभे राहावी म्हणून मला मंदिरांची कामे करण्याची आवड आहे, संत भगवान बाबा यांचे मंदिर शहरात असावे यासाठी निर्मलनगर भागात मंदिराचे काम सुरू केले. त्यावेळी खूप अडचणींना सामोरे जावे लागले मात्र आज या भागात मंदिर उभे राहिले आहे. सभामंडपाच्या कामासाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. समाजामध्ये आपण वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून मी नेहमीच आपले कर्तव्य पार पाडत असतो असे ते म्हणाले.