आनंदऋषीजी हॉस्पिटलची राज्यभर प्रचिती निर्माण झाली आहे : पो. नि. प्रताप दराडे

0
93

कॅन्सर तपासणी शिबीराचे उद्‌घाटन 

नगर – कित्येक वर्षापासून रुग्णसेवेच्या माध्यमातून सुरु असलेल्या चांगल्या कार्यामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटलची सर्व राज्यभर प्रचिती निर्माण झाली आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे कार्य चांगले असून, त्याबरोबर त्याच्याशीच संबंधित नर्सिंग ट्रेनिंग सेंटर, ब्लॅड बँक, भोजनगृह इतरही सर्व सेवा सुविधा या हॉस्पिटलने चांगल्या उपलब्ध करुन दिल्या असून, एक परिपूर्ण असे हॉस्पिटलचे कार्य आपणास पहावयास मिळते. सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटलमुळे गरजू रुग्णांची मोठी सोय होत आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचार्‍यांसाठीच्या योजना, विविध कंपन्यांचे मेडिलेम सुविधा असल्याने त्यांचाही चांगला फायदा रुग्णांना होत आहे. या रुग्णसेवेच्या कार्यात जैन सोशल फेडरेशने कार्यकर्ते तन-मन-धनाने झोकून देत काम करत आहे, ही कौतुकास्पद असेच आहे.

हॉस्पिटल प्रशासनास पोलिसांचे नेहमीच सहकार्य केले जात असल्याचे असे प्रतिपादन कोतवालीचे पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांनी केले. जैन सोशल फेडरेशन संचलित आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तपासणी शिबीराचे उद्घाटन माणिकचंद व सौ.निर्मला बोकरीया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सज्जनबाई शिंगवी, कोतवालीचे पो.नि.प्रताप दराडे, चेतन बोकरीया, जियान बोकरीया, उज्वला सतीश लोढा, कमलबाई लुंकड, हितेश शिंगवी, पोपटलाल लोढा, सुनिल मालू, डॉ.राम पांडे, संतोष बोथरा, सतीश लोढा, डॉ.आशिष भंडारी, प्रकाश छल्लानी, माणकचंद कटारिया, सुभाष मुनोत, महेंद्र कांकरिया, तज्ञ डॉटर डॉ.दत्तात्रय अंधुरे, डॉ.सतीश सोनवणे, डॉ.रविराज गवळी, डॉ.भास्कर जाधव, डॉ. रविंद्र मुथा, डॉ.सोनाली बोरुडे, डॉ.मितेश कटारिया, डॉ.भक्ती फलके, डॉ.सोनाली सोलट, डॉ.मुकुंद उंडे, डॉ. सारिका झरेकर, डॉ.नरेंद्र पाटील आदि उपस्थित होते. याप्रसंगी निर्मला बोकरीया म्हणाल्या, सर्वकाही देणारा तर देवच आहे, आपण फक्त एक निमित्त आहोत, आमच्या परिवाराला ही सेवा करण्याची संधी मिळाली, हे आम्ही आमचे भाग्यच समजतो.

प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलांना संस्कार, धन देत असतात पण माझ्या आई-वडिलांनी याबरोबरच सामाजिक, धार्मिक संस्कारही दिले आहेत. त्यामुळेच आम्ही कार्य करीत आहोत. यावेळी माणकचंद बोकरीया म्हणाले, पूजा-अर्चा करण्यापेक्षा मानवसेवा महत्वाची आहे. समाज ऋण फेडण्याची संधी फार कमी लोकांना लाभते, आम्हाला ही संधी मिळाली, असल्याचे सांगितले. याप्रसंगी कॅन्सर तज्ञ डॉ.दत्तात्रय आंदुरे म्हणाले, कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्यासाठी वेळेवर उपचार आणि मार्गदर्शन हे महत्वाचे आहे. कॅन्सर विषयी विनाकारण भिती न बाळगता त्याचा धैर्याने सामना केला पाहिजे. आधुनिक मशिनरीच्या सहाय्याने हॉस्पिटलमध्ये घशाचा, फुफुसाचा, आताड्याचा, तोंडाचा आदिंसह स्त्रीयांचा स्तनाचा, गर्भाचा कॅन्सर तपासणी व उपचार होऊ शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केले पाहिजे. सूत्रसंचालन आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. या शिबीरात ८७ रुग्णांची तपासणी करण्यात आली.