अनाधिकृत जाहिरात, फ्लेक्स बोर्ड व होर्डींगवर महापालिकेची कारवाई

0
26

नगर – आयुक्त तथा प्रशासक यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या चारही झोन व अतिक्रमण विभाग मुख्यालय यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे शहरातील अनाधिकृत जाहिरात, फ्लेस बोर्ड, व होर्डींग, छोटे मोठे फलक इ. हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १३ मार्च रोजी शहरातील मोठे ४० फ्लेस बोर्ड व छोटे ७५ बोर्ड हटविण्यात आले आहे. सदरची मोहिम यापुढेही सतत चालु राहणार आहे. तरी याबाबत नागरीक, कार्यकर्ते, व्यावसायीक यांनी अनाधिकृतरीत्या फ्लेस बोर्ड, जाहिराती, सुभेच्छा फलक लावू नये व महानगरपालिकेस सहकार्य करावे अन्यथा संबंधितांवर सार्वजनिक मालमत्ता विदृपीकरण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.