ओंकारनगर शाळेत बाल आनंद मेळावा

0
41

नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेत आयोजित बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विक्रेते बनत खरेदी विक्रीचा अनुभव घेत १५००० रुपयांची कमाई केली. पाणीपुरी, पापडभाजी, वडापाव, भेळ, समोसे, मसाला ताक, ऍपल शेक, कस्टर्ड, चकली, पापडी चाट, ढोकळा, लिंबू शरबत, शेंगदाणा लाडू, नाचणी लाडू, इडली चटणी, रोझ शरबत, ब्रेड पॅटीस, चकली, कोथिंबीर वडी, लस्सी, डाळीचे लाडू, मंच्युरियन, भाजीपाला इत्यादी पदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने लावले होते. उपस्थित विद्यार्थी, पालक, नागरिक यांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलवर भेट देत खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे होते. भैरवनाथ सायकलचे सोमनाथ बनकर, माजी नगरसेवक अमोल येवले, अनिल हिवाळे, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, इनरव्हील लबच्या अध्यक्षा लक्ष्मी काळे, सेक्रेटरी रेश्मा चारनिया, केडगावचे सबपोस्ट मास्तर संतोष यादव, सप्तरंगचे नंदेश शिंदे, नंदा यादव, वैजयंती जोशी, मंगेश पाटेकर, मुख्याध्यापक अक्षय सातपुते, विजय घिगे, अमोल बोठे, अरुण पवार, विक्रम लोखंडे, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे उपस्थित होते. भैरवनाथ सायकल सेंटर केडगावचे सोमनाथ बनकर यांनी स्वरांजली लोळगे या विद्यार्थीनीला सायकल भेट दिली. तसेच इनरव्हील लब ऑफ अहमदनगरच्या वतीने महिला पालकांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, नफा-तोटा समजावा, विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढावे, गतीने आकडेमोड करता यावी, नाणी-नोटा यांचा व्यवहार समजावा म्हणून शाळेत दरवर्षी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते असे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी प्रास्ताविकातून सांगितले.

महापालिका शाळांमध्ये दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या कौशल्यांचे शिक्षण बालवयातच दिले जाते याचा विशेष आनंद आहे. तसेच ओंकारनगर शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जातात, असे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे आपल्या मनोगतात म्हटले. यावेळी नगरसेवक अमोल येवले, इनरव्हील लबच्या अध्यक्षा लक्ष्मी काळे यांनीही आपल्या मनोगतातून ओंकारनगर शाळेतील चिमुकल्यांचे व शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी केले. सूत्रसंचालन अरुण पवार यांनी केले. शिवराज वाघमारे यांनी आभार मानले. सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे, प्रियंका लोळगे, रेश्मा पानसरे, पुनम बडे, दुर्गा घेवारे, कवित वाघमारे, संध्या तोडमल, पल्लवी भुजबळ, भावना पवार, रोहिणी काळे, दिपाली साळवे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.