मोहटा देवस्थान ट्रस्टच्या सीईओ विरोधात मानधनी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

0
81

सीईओंना हटवा व कर्मचाऱ्यांचा त्रास थांबवा, वेतन श्रेणी लागू करावी; कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कारवाई करण्याची मागणी

नगर – मोहटा देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या विरोधात देवस्थान ट्रस्टच्या मानधन तत्वावर काम करणार्‍या कामगारांनी बंड पुकारले असून १३ मार्चपासून देवस्थानच्या मुख्य द्वारावर हे कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणा बाबत लाल बावटा जनरल कामगार युनियनने जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार करून निवेदन दिले आहे. मोहटा देवस्थानकडे मानधन तत्वावर काम करणार्‍या काही कामगारांना गेली दहा- बारा वर्ष येथे काम करून झाले आहे. निवेदनात म्हटले आहे की, श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कामगारांच्या तक्रारी बद्दल कार्यवाही व्हावी यासाठी १३ मार्च पासून कर्मचार्‍यांचे बेमुदत आमरण उपोषण केले जात आहे. यापूर्वी जवळपास ५७ कर्मचार्‍यांनी देवस्थानचे तत्कालीन चेअरमन अशोककुमार भिल्लारे यांना देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विषयी विविध तक्रारी अर्ज दिले होते अर्जाचा विचार करून त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. चौकशी समितीने कामगारांच्या तक्रारीबाबत चौकशी करून लेखी तक्रार अर्ज समितीने घेतलेले आहेत. ही चौकशी होऊन ४ वर्षांचा कालावधी होऊनही अद्यापपर्यंत कोणत्या प्रकारची कार्यवाही झालेली नाही. यापूर्वी श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटेचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश यांना पत्रादवारे संघटनेने पत्र व्यवहार केलेला आहे. कर्मचार्‍यांनी चौकशीमध्ये लेखी दिल्या असून त्या तीव्र स्वरूपाच्या आहे. त्या भावनेचा विचार करणे गरजेचे आहे. कर्मचा-यांचा वापर स्वतःच्या स्वार्थापोटी केलेला आहे. कामगारांच्या तक्रारी आहेत. ते सर्व विश्वस्त समितीला कळवणे आवश्यक आहे. परंतु सध्या ते होत नाही. त्यामुळे देवस्थानच्या कामगारांच्या भविष्याचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. यापूर्वी देवस्थानचे चेअरमन व त्रिसदस्य विश्वस्त समिती यांना कर्मचार्‍यांमार्फत व संघटनेमार्फत वेळोवेळी विनंती अर्ज केलेले आहेत व पत्राचे स्मरण दिले आहे.

संस्थांनकडे याविषयी चौकशी अहवाल अद्यापपर्यंत उघड झालेला नाही. याचे कारण कामगारास आजपर्यंत समजलेले नाही? तक्रारीला ४ वर्षे पूर्ण होऊनही कामगारांना त्रास व पिळवणूक चालू असून त्यावर समिती काही निर्णय घेणार आहे का नाही हा प्रश्न कामगारांना व संघटनेला पडलेला आहे? त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय अपेक्षित आहे अहवाल उघड करुन पुढील कार्यवाही करण्यात यावी चौकशी समितीच्या अहवालाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेचे सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे (अध्यक्ष), अ‍ॅड. कॉ. सतिश पवार (उपाध्यक्ष), अमोल भगवान दहिफळे (सहसेक्रेटरी), धनंजय सुभाष आव्हाड (कार्यकारीणी सदस्य), मारुती सुदाम दहिफळे (कार्यकारीणी सदस्य), शहादेव भगवान पालवे, बाबासाहेब दत्तात्रय दहिफळे व सर्व कर्मचारी सभासद मोहटादेवी देवस्थान ट्रस्ट यांनी निवेदनातून केली आहे. कामगाराच्या प्रमुख मागण्या – १) हुकूमशाही करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हटाव व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. २) कर्मचार्‍यांना बेकायदेशीर होणारा त्रास बंद झाला पाहिजे, कर्मचारी सेवक सोसायटी पतसंस्थेची चौकशी करावी. ३) सर्व कर्मचार्‍यांना प्रशासनाकडून सामान्य वागणूक मिळावी. ४) मानधन कर्मचारी समय वेतन श्रेणी लागू करावी. ५) २३ व २७ ऑगस्ट २०२० रोजीच्या त्रिसदस्य समितीने घेतलेल्या तक्रारीवर कारवाई करावी.