कोतवाली पोलीस स्टेशनमधील त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी

0
54

अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

नगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांना ८/२/२०२४ रोजी कोतवाली पोलिस स्टेशन परिसरात काही एक कारण नसताना तानाजी पवार या पोलीस कर्मचार्‍याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत लाथा बुयांनी मारहाण केली तसेच तुला खोट्या गुन्हात अडकून टाकेल अशी धमकी दिली होती. या संदर्भात मनसेने पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांना वारंवार निवेदन दिले होते तसेच अधीक्षक कार्यालयाबाहेर ३ दिवस उपोषण केले होते त्यावेळी पोलीस प्रशासनाने संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते परंतु महिना उलटून देखील कर्मचार्‍यावर कारवाई होत नसल्यामुळे मनसेचे शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना भेटून परत स्मरण करून देण्यात आले तानाजी पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे. यावेळी सचिन डफळ, गजेंद्र राशीनकर, अ‍ॅड. अनिता दिघे, संतोष साळवे आदी उपस्थित होते.