एसा स्पोर्टस्‌ विक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा

0
32

नगर – एसा स्पोर्टस् विक अंतर्गत फुटबॉलसह विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एसा टायगर टीमचे कप्तान धनंजय देशमुख यांची टीम विजेती ठरली तर ओमकार म्हसे कप्तान असलेली एसा चार्जर टीमला उपविजेतेपद मिळाले. स्विमिंग स्पर्धेत ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये आलोक जाजु हे प्रथम, तर हेमंत लिंगायत द्वितीय आणि प्रितेश कांकरिया तृतीय आले तर महिलांमध्ये श्रद्धा अंदुरे या विजेते ठरल्या. टेबल टेनिस स्पर्धेत अमेय कुलकर्णी यांना विजेतेपद तर वैशाखी हिरे यांनी उपविजेतेपद मिळविले. बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन स्टेट लेव्हल गोल्ड मेडल विजेत्या आणि पुणे विद्यपीठातील स्पर्धेत पाच वेळेस निवड झालेल्या चारुता वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत दीपक नगोरी यांची टीम विजेती ठरली तर विनोद काकडे यांच्या टीमला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. चेस स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय हॉकी प्लेअर आणि भारतीय हॉकी टीमचे सदस्य लेन आयप्पा यांनी केले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रोशन गुगळे, द्वितीय रवी माने तर तृतीय पारितोषिक मधुकर बालटे यांना मिळाला.

 

कॅरम स्पर्धेचे उद्घाटन कॅरम कोच आसिफ सर तसेच इन्स्टिट्यूट ऑफ आर्किेटेचर असोसिएशन अहमदनगर सेंटरचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी केले. यावेळी झालेल्या अटीतटीच्या स्पर्धेत विजेते प्रशांत आढाव व प्रितेश गुगळे उपविजेते भूषण पांडव व अभिजित देवी तर तृतीय क्रमांक मधुकर बालटे व विजय उजनिमठ यांना मिळाले. या सर्व उपक्रमास प्रायोजक पोलाद स्टील जालना यांचे प्रतिनिधी यश दायमा, सुशांत गव्हाणे आणि त्यांची टीम उपस्थित होती. कमिटी अध्यक्ष भूषण पांडव यांनी या स्पर्धेत संस्थेच्या शंभर पेक्षा जास्त सभासदांनी सहभाग घेतल्याचे सांगितले. या उपक्रमात अभिजित देवी, जितेश सचदेव, जोहेब खान अमेय कुलकर्णी या कमिटी सभासदांनी काम पाहिले. सचिव प्रदिप तांदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अध्यक्ष रमेश कार्ले यांनी आभार मानले.