राजकीय आकसातून केडगावमध्ये जिवे मारण्याच्या वारंवार धमक्या

0
37

सेवानिवृत्त एसटी कर्मचार्‍याची पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

नगर – राजकीय आकसातून सेवानिवृत्त एसटी कर्मचार्‍याला व त्याच्या कुटुंबियांना खोटया गुन्ह्यात अडकविण्याच्या तसेच जीवे मारण्याच्या धमया दिल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत त्या कर्मचार्‍याने जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. अशोक मारुती नरवडे (रा. मोहिनीनगर, केडगाव) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते गेल्या ५० वर्षापासून मोहिनीनगर मध्ये राहत असून एसटी महामंडळातून निवृत्त झालेले आहेत. त्यांना जुन्या राजकीय वादातून तेथील एक इसम वारंवार नरवडे यांना शिवीगाळ करत खोटया गुन्ह्यात अडकविण्याच्या तसेच जीवे मारण्याच्या धमया देत आहे. सदर इसम हा गुंड प्रवृत्तीचा असून तो कोतवाली पोलिस ठाण्यात खोट्या केसेस देत त्यांना मानसिक त्रास देत आहे. यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली असून धमया देणार्‍या इसमावर कारवाई करावी अशी मागणी नरवडे यांनी या तक्रार अर्जात केली आहे.