श्री मार्कंडेय मंदिरात सद्‌गुरू श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा

0
34

नगर – सद्गुरु श्री गजानन महाराज प्रकट दिन सालाबाद प्रमाणे श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान, गांधी मैदान, अहमदनगर येथे साजरा करण्यात आला. प्रकट दिन निमित्त सकाळी ७ वाजता श्रींच्या मुर्तीस रुद्राभिषेक, दुपारी १२ वाजता आरती, सायंकाळी ५ वाजता श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम, सायंकाळी ७:३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता महाप्रसादाचे वाटप, संध्या. ७.३० ते रात्री ९ वाजता भजन संध्याने प्रकट दिन साजरा झाला. श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त श्री मार्कंडेय देवस्थान च्या वतीने भाविकांसाठी आमटी, भात, भाकर, पिठलं, ठेचा, बुंदी आदी महाप्रसाद वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला तसेच मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री मार्कंडेय देवस्थान आवारा मधील श्री गजानन महाराज मंदिरास आकर्षक फुलांची सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली त्यामुळे मंदिरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. श्री मार्कंडेय देवस्थान च्या वतीने दरवर्षी श्री सद्गुरु गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाप्रसादासाठी सहकार्य करणार्‍या सर्व भाविक भक्तांचे देवस्थानचे उपाध्यक्ष त्रिलेश येनगंदुल यांनी आभार व्यक्त केले.

तसेच वर्षभरात विविध धार्मिक उत्सवाचे आयोजन श्री मार्कंडेय देवस्थानच्या वतीने केले जाते, त्यात श्री मार्कंडेय जयंती, श्री गणेश जयंती, महाशिवरात्री उत्सव, श्रीराम नवमी, श्री हनुमान जयंती, श्री दत्त जयंती, धर्मनाथबीज उत्सव, श्री गजानन महाराज प्रकट दिन, आषाढी एकादशी उत्सव, नारळी पौर्णिमा उत्सव, रक्षाबंधन उत्सव, या उत्सवांच्या माध्यमातून अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम वर्षभर देवस्थानच्या वतीने राबविण्यात येत असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम यांनी दिली. श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव यशस्वीतेसाठी देवस्थानचे सर्व पदाधिकारी व श्री मार्कंडेय मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य, कुमार आडेप, धनंजय येनपटला, वाय प्रकाश टेलर, रघुनाथ गाजेंगी, दत्तात्रय जोग, रमाकांत बिज्जा, गणेश आकेन, विनायक बत्तीन, शिवाजी संदुपटला, सागर सब्बन, शंकर नक्का, अंबादास चाटला, अंबादास रच्चा, अजय गुरुड, रमेश कोंडा, श्रीनिवास वंगारी, हनुमान म्याकल, शंकर मुत्याल, व्यंकटेश नक्का, लक्ष्मण वंगा, ऋषी गुंडला, प्रमोद अंकम, शंकर जिंदम, शुभम सुंकी, श्रीनिवास एलाराम, श्रीनिवास बुरगुल, विजय मच्चा, राम वंगा, बालकिसन आकूल, दिलीप गटने, लक्ष्मण इगे, चंद्रकांत सब्बन, रवी दंडी, राजेंद्र इगे, दत्तात्रय बडगू आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.