‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर’ नामांतराचा प्रस्ताव पाठविल्याबद्दल मनपा आयुक्तांचा सत्कार

0
34

नगर – अहमदनगर शहराचे नाव बदलण्यात यावे, यासाठी विविध संघटना, संस्था, पक्षांच्या वतीने निवदने देण्यात आली. नाम ांतरासाठी अहिल्यादेवी होळकर नामंतर कृती समितीची स्थापना करुन राज्यभर रथयात्रा काढण्यात आली होती. सर्वांच्या भावनांचा विचार करुन शासनाने या नगरच्या नामांतरास मान्यता दिली. प्रशासकीय सोपस्कार पुर्ण होत, नगर मनपानेही ठराव करुन तो शासनाकडे पाठविला हा या लढ्याचा विजय आहे. याबद्दल मनपाचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांचा सत्कार करुन आभार व्यक्त केले आहे. या नामांतराच्या लढ्यात अनेकांचे सहकार्य मिळाले, अशा सर्वांचेही आम्ही आभारी आहोत. लवकरच नगरचे कायदेशीर नामांतर होईल, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामांतर कृती समितीचे विजय तमनर यांनी केले. ‘पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकरनगर’च्या नामांतराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मनपा आयुक्त डॉ. पंकज जवळे यांनी पाठविल्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामंतर कृती समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विजय तमनर, सचिन डफळ, अनिल ढवण, बापुसाहेब बाचकर, काका शेळके, पांडूरंग दातीर, भगवान जर्हाड, दत्ता खेडेकर, अनिल डोलनर आदि उपस्थित होते. बापू बाचकर म्हणाले, अहमदनगरच्या नामांतराचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होता, यासाठी सर्वच आग्रही होते आणि नगरकरांचीही इच्छा होती. आज ही नगरचे नामांतर होऊन पुर्तता झाली, ही मोठी समाधानाची बाब आहे. मनपा प्रशासनाने योग्य कारवाई करुन तो पाठविला याबद्दल आम्ही आभारी आहोत. पुढील काळात नगरची ओळख ही ‘अहिल्यानगर’म्हणून होईल, असेही त्यांनी सांगितले.