जिल्हा परिषदेच्या ११ शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0
46

नगर – भानुदास कोतकर फाउंडेशनच्या वतीने केडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक नीलेश सातपुते, मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, सुनील कोतकर, भूषण गुंड, अशोक कराळे, शिवा मोढवे, पोपट कराळे, गणेश कराळे, शेळके, राहुल कांबळे, वैभव गिरी, संजय गुंड, महेश कार्ले, आसीफ सय्यद, महेश झरेकर, ईश्वर नवसुपे उपस्थित होते. श्री. कोतकर यांचा वाढदिवस केडगाव- मध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सामाजिक भावनेतून कार्यरत असलेल्या भानुदास कोतकर फाउंडेशनने वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या ११ शाळांमधील सुमारे १५०० शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केले. यावेळी नीलेश सातपुते म्हणाले की, केडगावच्या विकासाची मुहूर्तमेढ भानुदास कोतकर यांनी रोवली.

नेप्ती उपबाजार समितीच्या माध्यमातून नगरची ओळख राज्यभर झाली. बेरोजगारांना रोजगाराची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भानुदास कोतकर फाऊंडेशनच्या वतीने केडगावमधील जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना शालेय साहित्य दिल्याचे ते म्हणाले. मनोज कोतकर म्हणाले की, भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर संदीप कोतकर यांनी शहराचा व केडगावचा विकास केला. त्यांच्या काळातील कामे सर्वांना ज्ञात आहेत. सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांत केडगावने आपले वेगळेपण कायम जपले आहे, असे ते म्हणाले. यावेळी जालिंदर कोतकर, शेळके, राहुल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.