सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत पडल्या लांबणीवर

0
72

नामनिर्देशन टप्पा सुरू असलेल्या संस्थांच्या निवडणुकानिश्चित वेळापत्रकानुसारच

नगर – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने ३१ मेपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. तथापि ज्या संस्थांच्या निवडणुका नामनिर्देशनच्या टप्प्यात आहेत किंवा न्यायालयीन आदेशानुसार ज्या संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. अशा संस्थांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे महेश नागरी सहकारी पतसंस्थेसह नामनिर्देशन पत्राच्या टप्प्यात असणार्‍या जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका निश्चित वेळापत्रकानुसार होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ मे पर्यंत स्थगिती देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ३८ हजार ७४० संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत.

शासन निर्णयानुसार नामनिर्देशनचा टप्पा सुरू झालेल्या तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे. अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करून ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सद्यस्थितीत नामनिर्देशनच्या टप्प्यात ११ संस्था असून अर्ज माघारीच्या टप्प्यात २३ संस्था आहेत तर मतदानाच्या टप्प्यात ४ संस्था आहेत. या संस्थांच्या निवडणुका होणार असून, नामनिर्दे शनचा टप्पा सुरू नसलेल्या पण प्रारूप अंतिम यादीच्या टप्प्यात असलेल्या संस्थांच्या निवडणुका या निर्णयानुसार स्थगित झालेल्या आहेत, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.